Viewsमायेची लागवड एक आगळावेगळा उपक्रम. 
    शिस्त, निष्ठ, स्पष्ट आणि दक्ष असे स पो.नि.श्री महेश लांडगे यांची संकल्पना. 

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

 उस्मानाबाद तालुक्यातील तडवळे (क) येथील रहिवासी व सध्या नांदेड जिल्ह्यात सेवेत असलेले तसेच सेवेत निष्ठता, बोलण्यात स्पष्टता व कर्तव्यात दक्षता म्हणून ओळखले जाणारे तडलळ्याचे भूमिपुत्र सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून 
पर्यावरण पुरक असा एक उपक्रम राबविण्यात येत असून तो दिवसेंदिवस सिध्दिस जाताना दिसत आहे. तो म्हणजे ज्या गावातील मुलामुलींचे लग्न जमतील, लागतील अशा सासर व माहेर च्या मंडळींनी आपल्या मुलीच्या आठवणी प्रित्यर्थ एक झाड व सासरी आलेल्या नी लग्नाची आठवण म्हणून एक झाड लावण्याची विनंती करण्यात येते. त्याचप्रमाणे गावातील अनेक प्रकारच्या इव्हेंट प्रसंगी व आपापल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक झाड लावावे नव्हे ती चळवळ ठरावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. व लोकांना ती आवडली आणि संकल्पना सिध्दिस गेली असून सध्या हि स्तुत्य संकल्पना केवळ एक इव्हेंट्स न रहाता ती एक आदर्श ती चळवळ उभी राहिली असल्याचे दिसुन येत आहे . 
          सध्या खाकीचा खाक्या काय असतो हे सज्जनापासून दुर्जनापर्यंत सर्वपरिचित आहे. याठिकाणी ओले वाळलेलेले सर्वच जळते.त्याला कारणं
पण तशी असतात. असा सर्वसामान्यांचा गोड गैरसमज आहे. परंतु वर्दीतले दर्दी सगळेच असतात असेही नाही. व दर्दी असणार्‍यांची संख्याही कमी नाही. संस्कृती नुसार संस्कार असणारेही भरपुर आहेत. अशांपैकी एक आदर्श व शिस्तबद्ध, सेवेत निष्ठता, कर्तव्यात दक्षता असणारे पर्यावरण प्रेमी सहायक पोलीस निरीक्षक श्री महेश लांडगे साहेब होय. 
         मागील काही वर्षापासून वातावरणाच्या असमतोलामुळे निसर्गाचा पार बट्टयाबोळ झाला.अधुनिकिकरणाच्या व प्रगतीच्या नावाखाली अतोनात वृक्षतोड झाली असल्याने पर्जन्यमान यथातथाच असल्याचे दिसुन येत आहे. पर्यायाने त्याचा परिणाम शेतकरी, शेतमजूर व एकंदरीतच सर्वच क्षेत्रात झाल्याचे दिसून येत आहे. शेतीला, पिण्याला, व जनावराना पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला असल्याने संभाव्य दुष्काळाची चिन्हे ओळखून शासनाने शतकोटी वृक्षलागवडीचे उदिष्ट डोळ्यासमोर ठेवून वृक्षलागवडीचा संकल्प केला व त्या त्या विभागाला आदेशितही केले. परंतु काहीनी दाखवण्यासाठी व फोटोसाठी वृक्षलागवड जोमात केली परंतु अपेक्षित संवर्धन न झाल्याने वृक्ष कोमात गेले तर प्रशासनाच्या ध्यानातूनही गेले. तर काही शासकीय विभागातील मोजकेच अधिकारी यानी शासनाच्या शतकोटी वृक्षलागवडीला भरभरून प्रतिसाद दिला व जोमात कसलाही गाजावाजा न करता जोशात वृक्षलागवड केली व जोमातच त्याचे संवर्धन केले. व जिथे जाऊ तिथे एकतरी वृक्ष लावू हे उद्दिष्ट ठेवले. त्यातच सहायक पोलिस निरीक्षक श्री महेश लांडगे सरानी त्यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संरक्षणासाठी नविन उपक्रम हाती घेतला. व त्या उपक्रमास जनतेचाही भरपुर प्रतिसाद मिळाला.तो असा मुलीने लग्न ठरल्यानंतर आपल्या आईवडीलांची आठवण म्हणून माहेरी एक वृक्ष लावायचा, तर सासरी आल्यानंतर लग्नाची आठवण म्हणून एक झाड लावायचे. तसेच गावातील छोटेमोठे इव्हेंट्स साजरे करताना एक झाड लावण्याची संकल्पना मांडली व गावातील नागरिकांच्या प्रतिसादामुळे साहेबांचा संकल्प सिध्दीस आला.असेच इतरही सर्व मंडळींनी वृक्षलागलडीचे संकल्प सोडून सिध्दिस नेहण्याचे प्रयत्‍न करावेत. 
Top