*शासनाकडून दीड लाख रुपये अनुदान मिळवून देते त्यासाठी पाच टक्के रुपये प्रमाणे पैसे भरावे लागतात असे बतावणी करून साडे सात हजार रुपये घेऊन महिला झाली पसार*
*धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके व महीला पोलिस हवालदार ज्योती गिरी यांच्या पथकाने अवघ्या काही तासांत भामट्या महीलेला केले जेरबंद*
धाराशिव/प्रतिनिधी
एका महिलेने तुमच्या नवऱ्याला शासनाकडून दीड लाख रुपये अनुदान मिळवून देते त्यासाठी पाच टक्के रुपये प्रमाणे पैसे भरावे लागतात असे बतावणी करून साडे सात हजार रुपये घेऊन महिला पसार झाली
बुधवार (दि.23) उपळा गावातील 79 वर्षीय कुसुम संदिपान खामकर यांनी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली की त्यांना एका महिलेने तुमच्या नवऱ्याला शासनाकडून दीड लाख रुपये अनुदान मिळवून देते त्यासाठी पाच टक्के रुपये प्रमाणे पैसे भरावे लागतात असे सांगून श्रीमती खामकर कडून सात हजार रुपये व श्रीमती खामकर यांचे आधार कार्ड व श्रीमती खामकर नवऱ्याचे आधार कार्ड घेऊन ती महिला निघून गेली तेव्हा श्रीमती खामकर आपली फसवणूक झाल्याचे जाणवल्याने त्या पोलीस स्टेशन धाराशिव ग्रामीण येथे येऊन त्यांनी फिर्याद दिली प्रकरणाची गंभीर दखल घेत धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारूती शेळके व माहिला पोलिस हवालदार ज्योती गिरी यांनी उपळा गावात व धाराशिव मध्ये सदर महिलेचा शोध घेतला असता ती मिळून आली त्याला तिचे नाव का विचारता तिने स्वतःचे नाव शुभांगी शिवराज स्वामी वय 49 वर्ष रा. रोड नंबर 4 हत्ते नगर लातूर असे सांगितले तिस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन धाराशिव ग्रामीण येथे नेऊन तिची अंगझेडती घेतली असता तिच्याकडे सात हजार रुपये व श्रीमती खामकरयांचे आधार कार्ड व त्यांच्या पतीचे आधार कार्ड मिळवून आले ते पुराव्या कमी जप्त करण्यात आले पुढील तपास महीला पोलिस हवालदार ज्योती गिरी हे करीत आहेत
सदर धाराशिव पोलिस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती शफकत अमाना धाराशिव पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री मारुती शेळके, पोलिस उपनिरीक्षक रोकडे, महिला पोलिस हवालदार ज्योती गिरी, आनंदनगर पोलिस ठाण्याचे महिला पोलिस शीतल पवार, यांनी केली
चौकट
खोट्या बतावणी, आश्वासन तसेच भुलथापा करणाऱ्या भामट्या महिला व पुरुष यांच्या भुलथापांना बळी पडू नका
श्री मारुती शेळके
पोलीस निरीक्षक
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे