*विद्याभवण हायस्कूल , कलंब येथील रोडवर गतिरोधक बसवण्यासंदर्भात मागणी.*
*मराठा सेवा संघ व विद्याभवण हायस्कूल यांनी दिले निवेदन.*
कळंब/प्रतिनिधी
शहरातील विद्याभवण हायस्कूल शाळेत दररोज जवळपास १५०० विद्यार्थी येतात, त्यांना शाळेकडे येताना रोड ओलांडावा लागतो . परंतू गतीरोधक नसल्याने वहाने खूप वेगात जातात. विद्यार्थ्यांना रोड ओलांडताना फार त्रास होत आहे. आजपर्यंत दोन- तीन मुलांना अपघात झालेला आहे.त्यामुळे सोमुनाका येथे शाळेच्या रोडच्या बाजूला व परळी रोड बायपासच्या शाळेच्या बाजूला दोन गतीरोधक करण्यात यावे अशी मागणी मराठा सेवा संघ कळंब व विद्याभवण हायस्कूल कळंब यांच्या वतीने मागणी करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष प्रा.अनिल फाटक,सचिव अरविंद शिंदे,संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक अतुलभैया गायकवाड, दत्ताभाऊ कवडे, विर भगतसिंह विद्यार्थी परिषद चे राहुल शेळके,अमोल पवार, शरद जाधव, .शुभम पवार,स्वप्नील पाटील आदी लोकांच्या सह्या होत्या.निवेदन देऊन विद्यार्थ्यांच्या जिवाची काळजीपोटी लवकरात लवकर गतीरोधक करावा अशी विनंती करण्यात आली.