*शेताजवळ भांडण- तक्रारी न करण्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी*
तुळजापूर/प्रतिनिधी
तालुक्यातील हंगरगा (तुळ) येथील नन्नवरे कुटूंबातील अमर, राहुल, अमोल, नितीन, ओंकार, उमेश, सतिष, आकाश यांसह अन्य 6 व्यक्तींनी त्यांच्या शेताजवळ भांडण- तक्रारी न करण्याच्या कारणावरुन दि. 04.11.2021 रोजी 19.45 वा. हंगरगा (तुळ) शिवारात भोसले गल्ली, तुळजापूर येथील संभाजी तानाजीराव पलंगे यांना शिवीगाळ केली. तसेच ठार मारण्याच्या उद्देशाने नमूद व्यक्तींनी संभाजी यांच्या डोक्यात, पाठीवर, हाता-पायावर तलवार, लोखंडी गज, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या संभाजी पलंगे यांनी दि. 06.11.2021 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात भा.दं.सं. कलम- 307, 143, 147, 148, 149, 324, 323, 504 सह शस्त्र कायदा कलम- 4, 25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.