Views


*एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करू:- प्रवीण रणबागुल (मराठवाडा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी)*भूम/प्रतिनिधी

   वंचित बहुजन आघाडीचा एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या समर्थनार्थ उपविभागीय अधिकारी कार्यालयावर प्रविण रणबागुल यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला.राज्याचे मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करून शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन निश्चिती करणे बाबत एस.टी.महामंडळ कर्मचारी यांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या भूम तालुक्याच्या वतीने यास पाठिंबा म्हणून महामोर्चाचे सोमवार दि.०८/११/२०२१ रोजी सकाळी ११ वाजता मोर्चा शहराच्या मुख्य रस्त्याने निघुन उपविभागीय कार्यालयासमोर सभेत रुपांतर झाले.एसटी महामंडळ कर्मचारी आपल्या न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला असून या संपास व मागण्यास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दर्शवला आहे त्याच अनुषंगाने भूम तालुक्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रविण रणबागुल यांच्या नेतृत्वाखाली या एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी आम्ही मोर्चाचे नियोजन केले आहे.एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती खराब झाल्यामुळे आत्तापर्यंत सुमारे ३०ते ४० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्याचे एकमेव कारण हे त्यांच्या तुटपुंजा पगार व पगाराची अनियमितता आहे त्यामुळे एसटी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना राज्य शासनामध्ये विलीनीकरण करून त्यांची शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन निश्चिती करण्यात यावी आणि खालील मुद्द्यावर राज्य सरकार व एसटी प्रशासनाने गांभीर्यपूर्वक विचार करून एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा.एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे.आत्महत्या केलेल्या कुटुंबास न्याय मिळालाच पाहिजे कोरोणा मध्ये मयत झालेल्या कर्मचारी यांना ५० लाख आर्थिक मदत देण्यात यावी.एसटी कामगारांचे कोरोणा काळातील वैद्यकीय बीले प्रकरणे तातडीने मंजूर करावीत.माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशाने जी समिती सरकारने नेमलेले आहे त्यात निश्कलंक असे प्रवीणजी गेडाम,तुकारामजी मुंडे या अधिकारी यांची नियुक्ती करावी या मागण्या केल्या आहेत.भूम तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष बी.डी.शिंदे, जिल्हा प्रवक्ता शहाजी चंदनशिवे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मुकुंद लगाडे, जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव, जिल्हा संघटक संतोष ईटकर, जिल्हा उपाध्यक्ष रोहिदास लोकरे जिल्हा कोषाध्यक्ष विद्यानंद वाघमारे, जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के, तानाजी बनसोडे, दत्तात्रय शिंदे, एल.टी.शिंदे, रवींद्र लोमटे, युवक जिल्हा उपाध्यक्ष वैभव गायकवाड, भूम तालुका अध्यक्ष मुसा शेख, महावीर बनसोडे,परंडा तालुका अध्यक्ष दिपक ओव्हाळ,रंधीर मिसाळ,भाग्यवंत शिंदे,वाशीहून जयपाल सुकाळे,कृष्णा शिनगारे,शिध्दोधन सरवदे,आक्की गायकवाड,आकाश गायकवाड,दिपक इजगज,अनिल भालेराव,एसटी कर्मचारी दयानंद शिंदे,मिलिंद वाघमारे, सुदाम कवडे ,सचिन चौधरी, मुकेश भगत राहुल काशीद,नामदेव नागरगोजे,पद्मिनी मांजरे,मनीषा यादव प्रतिभा वाघमारे, दिपाली मुळे,वैभव हाराळ आदी कार्यकर्ते कर्मचारी भूम-परंडा-वाशी तिल शाखेचे पदाधिकारी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
 
Top