*शहरातील ज्येष्ठ नागरिक संघटनेकडून पठाण यांचे सत्कार*
कळंब/प्रतिनिधी
कळंब पोलीस स्टेशनचे वाहतुक प्रमुख तसेच कर्तव्यदक्ष अंमलदार पोलिस नाईक फरहान पठाण हे कर्तव्यावर असताना सोमवार दि.२२ रोजी पठाण हे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल कर्तव्य बजावत असताना आप्पासाहेब यादव रा.सोनसांगवी ता.केज जि. बीड यांचे हारवलेले पॉकेट पठाण यांना सापडले ज्यामध्ये 7 हजार रुपये व इतर महत्त्वाचे कागदपत्रे पडताळणी करून संबंधित इसमास परत केले..
फरहान पठाण यांच्या ह्या कौतुकास्पद कामामुळे कळंब पोलीस, उस्मानाबाद पोलीसच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा जनमाणसांमध्ये उंचावली आहे..
या अभिमानास्पद आणि इमानदार वर्तणुकीची पोच पावती म्हणून कळंब शहरातील ज्येष्ठ नागरिक संघटनेकडून पठाण यांचे सत्कार केला यावेळी महादेव महाराज आडसुळ,डि.के.कुलकर्णीसर, सामाजिक कार्यकर्ते सचिन क्षिरसागर, बापू जोशी आदी उपस्थित होते
कळंब शहरात सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.