Views*अटल भूजल योजनांतर्गत* 
*जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन*


उस्मानाबाद/प्रतिनिधी

 जिल्हास्तरीय अटल भूजल योजनांतर्गत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि. 26 नोव्हेंबर 2021 रोजी उस्मानाबाद येथील मध्यवर्ती प्रशासकिय इमारतीतील डी.पी.डी.सी.हॉलमध्ये आयोजित केली आहे.या कार्यशाळेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावंकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत अटल भूजल योजनेमध्ये समाविष्ठ असलेले उस्मानाबाद तालुक्यातील 50 आणि उमरगा तालुक्यातील 05 गावे अशा एकूण 55 गावातील सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, जलसंधारण अधिकारी आदींनी कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक गायकवाड यांनी केले आहे.


 
Top