Views


*बुथ तेथे उद्योजक निर्माण करण्यासाठी नव उद्योजकांचा मेळावा परंडा येथील आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


 आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून बुथ तेथे उद्योजक निर्माण करण्यासाठी नव उद्योजकांचा मेळावा आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या संपर्क कार्यालय, परंडा येथे दि.24 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून व भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी व जिल्हा उद्योग केंद्र उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील प्रत्येक बुथ वर एक उद्योग अशा कार्यक्रमाचे उद्घाटन परंडा येथे आ.सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या संपर्क कार्यालयात करण्यात आले. तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांना उद्योग विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अगोदर सक्षम व्हावे आत्मनिर्भर होऊन इतरांना मदत करून याविषयी माहिती भाजपा जिल्हा उद्योग आघाडीचे शुशांत भुमकर यांनी दिली. तसेच विविध योजनांची माहिती प्रा. किरण आवटे सर व जिल्हा उद्योग निरिक्षक सुरेश पवार यांनी मार्गदर्शन करून दिली. यावेळी उद्योग आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत पाटील, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, सरचिटणीस विठ्ठल तिपाले, ॲड.तानाजी वाघमारे, रमेश पवार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अनिल पाटील, निशीकांत क्षिरसागर, प्रमोद लिमकर, सागर पाटील, शरद कोळी व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*लोहारा शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर -- आ.ज्ञानराज चौगुले*

उस्मानाबाद/इकबाल मुल्लालोहारा शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडुन नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजने अंतर्गत निधी मंजूर झाला असुन यासाठी आ.ज्ञानराज चौगुले यांनी नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केला होता. यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. या निधीतून लोहारा शहरातील विविध प्रभागातील महत्त्वांच्या रस्त्यांची कामे पुर्ण करण्यात येणार आहेत. यापूर्वी जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत विविध प्रभागात मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त करून घेऊन कामे पुर्ण करण्यात आली आहेत. परंतु अनेक प्रभागात विकास कामांना निधी प्राप्त न झाल्याने येथील समस्या कायम होत्या. या अनुषंगाने उर्वरित कामांसाठी सदर योजनेतून निधी मंजूर करुन घेतला आहे. यापुढील काळातही लोहारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरगोस निधी उपलब्ध करून देण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासित केल्याचे आ.ज्ञानराज चौगुले यांनी सांगितले. व निधी मंजूर केल्याबद्दल आ.ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंकरराव गडाख पाटील यांचे आभार मानले आहे.*स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपा कार्यकर्त्यांनी संघटना मजबूत करावी -- धनंजय कुलकर्णी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक लढविण्याच्या दृष्टीने पक्षाकडून संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी उमरगा शहर आणि तालुक्यातील सर्व बूथ रचना करून येणारी नगर परिषद आणि जि.प.आणि पं.स. निवडणुका ताकदीने लढवून जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेत पाठवावेत यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तयारी करावी अशी सुचना भारतीय जनता पार्टीचे समर्थ बूथ अभियानचे मराठवाडा विभागीय संयोजक आणि विभाग कार्यालय मंत्री धनंजय कुलकर्णी यांनी केली. यावेळी जिल्हा सरचिटणीस माधव पवार, तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, प्रभारी नगराध्यक्ष राजू गायकवाड, सिद्धेश्वर माने, नगरसेवक गोविंद घोडके, महादेव सलके, बाबुराव कलशेट्टी, किरण रामतीर्थे, अमर वरवटे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


*शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबविण्यात यावी -- भाजपा परंडा तालुका*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबविण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन भाजपा परंडा तालुका यांच्या वतीने तहसीलदार यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, परंडा तालुक्यात या वर्षी अतिवृष्टी, कोरोना यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना अद्याप पिकविमा तसेच हेक्टरी अनुदान मिळालेले नाही. बाजारात कुठल्याही शेतीमालाला भाव मिळत नाही. शेतीमाल कवडीमोल किंमतीने शेतकऱ्यांना विकावा लागत आहे. त्यामुळे आज रोजी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कोडमडलेली आहे. अशातच शेतकऱ्यांची थट्टा या आघाडी सरकारने लावलेली असुन हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. या सरकारने शेतकऱ्यांच्या कुठल्याच हिताचा निर्णय न घेता शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडण्याचे काम करत आहे. तरी सरकारने सर्वसामान्य तळागाळातील शेतकऱ्यांचा विचार करून तात्काळ विज तोडणी थांबवावी, अन्यथा भाजपा परंडा तालुका यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, अल्पसंख्याक प्रदेश चिटणीस अॅड.जहीर चौधरी, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष कांतीलाल पाटील, तालुका सरचिटणीस विठ्ठल तिपाले, भाजपा तालुका उपाध्यक्ष रमेश नाना पवार, अनिल पाटील, तानाजी पाटील, युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गोडगे, राहुल जगताप, सागर पाटील, पोपट सुरवसे, श्रीकृष्ण शिंदे, आदि उपस्थित होते.


 
Top