Views


*युनियन बँकेला 103 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लोहारा शहरातील बॅंक शाखेत वर्धापन दिन साजरा*
 
उस्मानाबाद/प्रतिनिधी


 युनियन बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेची स्थापना होऊन 103 वर्षे पुर्ण झाले असून बँकेची यशस्वी वाटचाल सुरु झाल्याबद्दल लोहारा शाखेत बँकेचे शाखा अधिकारी विजय राठोड, व मान्यवरांच्या हस्ते दि.11 नोव्हेंबर रोजी केक कापून व ग्राहकांना पेढे भरवून मोठ्या उत्साहात बँकेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. तसेच बँकेमार्फत ग्राहकांना देण्यात येणाऱ्या विविध सोई सुविधाबाबत माहिती देण्यात आली. युनियन बँकेच्या देशभरात 9 हजार 300 शाखा असून एकूण 1 कोटी 20 लाख ग्राहक संख्या आहे. तर एकुण 8 हजार 216 ग्राहक सेवा केंद्र (बि. सी. पॉईंट) द्वारे ग्राहकांना दर्जेदार सेवा पुरवली जात आहे. यावेळी शाखा व्यवस्थापक विजय राठोड, प्रभारी नायब तहसीलदार महादेव जाधव, उपशाखाधिकारी प्रवेश सिंग, सहाय्यक शाखा अधिकारी मनोहर जगदाळे, लिपीक सुमित लड्डा, रोखपाल दामोदर सुर्यवंशी, सूड लाईफचे ओमप्रकाश बरदापुरे, शिपाई बसय्या स्वामी, पांडुरंग राठोड, बँकेचे ग्राहक नाना पाटील, सिद्धेश्वर बँकेचे शाखा अधिकारी श्री. गंगापुरे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे उपशाखाधिकारी मयुर मिसाळ, ग्राहक सेवा केंद्र चालक (बि. सी) अशोक दुबे, यांच्यासह बँकेचे सर्व ग्राहक, हितचिंतक उपस्थित होते.
 
Top