Views*शांतीदुत परिवार व पंचायत समिती यांच्या वतीने आदर्श गाव निर्मीतीचे मॉडेल उभं करणारे पाटोदा गावचे माजी सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांचे उमरगा व परिसरातील सरपंच व युवकांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

शांतीदुत परिवार व पंचायत समिती यांच्या वतीने आदर्श गाव निर्मीतीचे मॉडेल उभं करणारे पाटोदा गावचे माजी सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांचे शुक्रवारी दि.20 ऑगस्ट रोजी उमरगा व परिसरातील सरपंच व युवकांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
हा कार्यक्रम उमरगा चौरस्ता येथील ओम लॉन्स येथे घेण्यात येणार आहे. यावेळी आपल्या भागातील सरपंचानी आपल्या गावातील विकास करावा, हगंदारी मुक्त गाव, पाण्याचे नियोजन, व्यवस्थापन आदी विषयी श्री. पाटील आपले अनुभव विषद करणार आहेत. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.विठ्ठलराव जाधव, शांतीदुत परिवारच्या संस्थापक अध्यक्षा सौ. विद्याताई जाधव, गटविकास अधिकारी कुलदिप कांबळे, डॉ.दा.ब.पतंगे, महाराष्ट्र टेक्निकल इन्टीट्युटचे प्राचार्य रमाकांत पुठ्ठेवाड, रोटरीचे अध्यक्ष डॉ.पंडीत बुटूकणे, वन परिमंडळ अधिकारी तुकाराम डिगुळे, सामाजीक वनीकरण अधिकारी उमेश बिराजदार, आदी उपस्थित राहणार आहेत. तरी उमगा तालुका व परिसरातील सरपंच व युवकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन शांतीदुत परिवारचे विद्यार्थी युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रा.युसुफ मुल्ला, शांतीदुतचे मराठवाडा अध्यक्ष प्रा.जिवन जाधव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top