Views*लोहारा शहरातील पोलीस वसाहतीचे नवीन बांधकाम करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात यावी -- राष्ट्रवादी शहराध्यक्ष आयुब शेख*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा शहरातील पोलीस वसाहतीचे नवीन बांधकाम करण्यासाठी तात्काळ प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष आयुब शेख यांनी गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी आहे. या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा शहरातील पोलीस वसाहतीचे मोठया प्रमाणात दुरावस्था झाली आहे, सण 1985 मध्ये याचे बांधकाम झाले आहे, आजतागायत याची दुरुस्ती झाली नाही. अनेक कर्मचारी हे सुविधा नसल्याने बाहेर भाड्याने राहत आहेत, सदर मोठी इमारत (निवास्थान) मोडकळीस आली आहे. जुने घर तात्काळ पाडून नवीन घरे बांधणे अंत्यत गरजेचे आहे. जुन्या घरामुळे पोलिसाची मानसिकता हतबल झाली आहे. त्या करिता लोहारा येथील पोलिसांना तात्काळ नवीन घर बांधकाम वसाहती करीता निधीची तरतूद करून प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, माजी नगरसेवक गगन माळवदकर, पांडुरंग पाटील, उपस्थित होते.
 
Top