Views*बार्टी तर्फे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या तर्फे व महासंचालक धम्मज्योती गजभिये (भा.प्र. से.), प्रकल्प अधिकारी तुषार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा तालुक्यातील वडगांव (गां) येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष हणमंत दणाने, लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष भागवत दणाने, रावण दणाने, शिवाजी दणाने, समतादूत नागेश फुलसुंदर, साई पवार, जावेद शेख, महादेव दणाने, लखन दणाने, नारायण दणाने, शशिकांत डोलारे, व्यंकट साळुंके, आदी, उपस्थित होते. यावेळी सुरुवातीला महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर समतादूत नागेश फुलसुंदर यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे सामाजिक कार्य वर्तवले. यावेळी गावातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top