Views*शेतकऱ्यांना स्वालंबी करण्यासाठी सर्व प्रयत्न करणार -मनोहर पुंड*

कळंब/प्रतिनिधी

शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्या कळंब सामजीक वनिकरणचे कर्तव्यदक्ष मनोहर पुंड यांनी सांगितले.वनक्षेत्रपाल सचिन लोंढे यांनि गेल्या चार वर्षात ज्या प्रकारे कळंब तालूक्यातील शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले व शेकडो एकर शेतात फळबागांसह विविध प्रकारची वृक्ष लागवड करून ते जतन करण्यास प्रोत्साहित केले त्याच प्रकारे मिही यापूढे तालूक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात रो . ह . यो . योजनेमार्फत शेतकऱ्यांना नवीन लागवड करण्यास शासनाच्या वतिने सर्व मदत करणार असून शासनाच्या विविध योजनाचा शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मत नवनियुक्त वनक्षेत्रपाल पुंड यांनि व्यक्त केले . गेल्या आठ दिवसापूर्वी वनक्षेत्रपाल लोंढे यांची संगमनेर येथे बदली झाली . त्यांच्या जागी मनोहर पुंड यांनी कार्यभार स्वीकारला असून त्या निमित्त पत्रकारांच्या वतिने त्यांचा सत्कार केला यावेळी पत्रकार धनंजय घोगरे , अमर चोंदे , आप्पा साहेब आंबिरकर , भारत शिंदे करर्मचारी सुरज फरतारे ,विजय व्हटकर , गायकवाड मँडम आदि उपस्थीत होते .
 
Top