Views


*विद्यार्थिनींनी सायकलसाठी प्रस्ताव दाखल करावेत
ग्रामपंचायत सदस्य बाकले यांचे आवाहन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिंनींसाठी दरवर्षी सायकलचे वाटप करण्यात येते. विद्यार्थिनींची पायपीट थांबावी, यासाठी हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे विद्यार्थिनींसह पालकांनी अंगणवाडी सेविका, शाळा किंवा महिला व बालकल्याण विभागाकडे तात्काळ मागणी अर्ज भरून प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी केले आहे. 
प्रस्ताव दाखलची ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदत आहे. सारोळा, शिंदेवाडी, काजळा, सकनेवाडी, वाघोली, दारफळ, चिखलीसह मेडसिंगा गावातील विद्यार्थिनींचे जास्तीत-जास्त प्रस्ताव मंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाणार आहेत. ज्या पालकांनी प्रस्ताव दाखल केले आहेत, त्याची पोहंच किंवा नावे ९५२७२००७९४ या व्हाट्सअप् क्रमांकावर पाठवावेत. अनेक विद्यार्थिनी शिक्षणासाठी पायपीट करत शाळा, महाविद्यालये गाठत आहेत. त्यामुळे त्यांची या माध्यमातून पायपीट थांबून त्यांचा शिक्षणाचा प्रवास सुकर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत जास्तीत-जास्त विद्यार्थिनींनी परिपूर्ण प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन विनोद बाकले यांनी केले आहे.
 
Top