Views*तुळजापूर येथे रक्तदान शिबिर आणि रयत बुक बँक उद्घाटन सोहळा संपन्न*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

तुळजापूर येथे दि.१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून विभाग उस्मानाबाद यांच्या वतीने तुळजापूर येथील ज्ञानसाधना सायन्स हब येथे रक्तदान शिबिर आणि रयत बुक बॅंक उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या रक्तदान शिबिरात एकूण ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांना सुद्धा वाचनाची आवड व्हावी, याकरिता रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान उस्मानाबाद यांच्या वतीने रयत बुक बँक चे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये एकूण १०० पुस्तके उपलब्ध असून अनेक दानशूर व्यक्तींनी याकरिता पुस्तके भेट स्वरूपात दिली आहेत. ही वाचनीय स्वरूपातील पुस्तके अनेकांना प्रेरणादायी आहेत. या कार्यक्रमासाठी ज्ञानसाधना सायन्स हबचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी गणेश तानवडे, zआकाश लांडगे, बालाजी तानवडे, सचिन भालेकर, शिवदर्शन उकरंडे, राम माने, ओमकार कदम, सूरज व्हटकर, मनोज देवकते, विशाल केदार, कुणाल लोमटे, प्रकाश भंडे, राम जळकोटे, प्रसाद राजमाने उपस्थित होते.
 
Top