Views*कुंभारी ता.तुळजापुर येथे लघुउद्योजक मेळावा संपन्न*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

तुळजापुरचे आमदार मा.राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतुन व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत दि.१२ ऑगस्ट २०२१ रोजी कुंभारी येथे लघुउद्योजक प्रोत्साहन मेळावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा उद्योग निरीक्षक सुरेश पवार, किरण आवटे व भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुहास वडणे यांनी केले व कार्यक्रमाचे नियोजन प्रा.ए.झेड पटेल यांनी केले. देशातील नव उद्योजकांना उभे करण्यासाठी पंतप्रधान मा.ना.श्री.नरेंद्रजीमोदी यांच्या संकल्पनेतून आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध योजना राबविण्यात येत असून लघु उद्योगासाठी केंद्राकडुन मोठे सहकार्य होत असल्याचे नमुद करत जिल्हयातील युवकांनी यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमासाठी प.स.सदस्य चितरंजन सरडे, सरपंच सौ.संगीता कोळी, उपसरपंच श्री संतोष क्षीरसागर, ग्रा.प.सदस्य मुन्ना कापसे, शहबाज पटेल, आण्णा तांबे, संतोष वडणे, दिपक वडणे, खंडु रोकडे, महावीर जगताप, महिला बचत गटाच्या महिला, प्रताप तांबे, मोहन बरडे, बाबु स्वामी व आब्बास पटेल व प्रचंड ग्रामस्थ उपस्थीत होते.
 
Top