Views


*लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नितीन काळे व पृथ्वीराजसिंह पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

साता समुद्रापार जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाणारे पहिले शिवशाहीर, संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार, विचारवंत, साहित्यिक, लेखक व कवी प्रबोधनकार, समाजसुधारक, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद शहरातील अण्णाभाऊ साठे चौक येथे भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे व पृथ्वीराज सिंह पाटील यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच शहरातील काका नगर सांजा रोड येथे अमोल पेठे यांनी आयोजित केलेल्या जयंती उत्सवात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यातआले. तसेच नगर परिषद समोरील वस्ताद लहुजी साळवे चौक येथे पूजा देडे यांनी आयोजित केलेल्या जयंती उत्सवात ही पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, बापू पवार, विलास लोंढे, मुकेश देडे, पांडुरंग लाटे, राहुल काकडे, संतोष हंबीरे, नितीन शेरखाने, सुरज शेरकर, सचिन लोंढे, पूजा राठोड, लक्ष्मण माने, स्वप्नील नाईकवाडी, यशवंत शहापालक, गणेश साळुंके, यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top