Views



*माजी आमदार सि.ना. आलूरे गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

शैक्षणिक, सामाजिक, सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान असणारे माजी आमदार लोकनेते सि.ना. आलूरे गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उस्मानाबाद येथील वीरशैव जंगम मठ ट्रस्टच्यावतीने आलुरे गुरुजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कळंबच्या नगराध्यक्ष सुवर्णाताई मुंडे, प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष स्मिताताई शहापूरकर, राष्ट्रवादीचे युवा नेते सागर मुंडे, डॉ. अनंत राजमाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सह साखर कारखान्याचे उपाध्यक्ष हनुमंत भुसारे, बसवेश्वर पत संस्थेचे चेअरमन श्रीकांत साखरे, वैजिनाथ गुळवे, रंगनाथ दुधाळ, गणपत पाळणे, शिवसेनेचे तुषार, निंबाळकर, उपशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, विस्तार अधिकारी कुंभार, विठ्ठल विभुते, विधीज्ञ भाऊसाहेब बेलुरे, विधीज्ञ राहुल लोखंडे, शांताबाई शेटे, अनिता गुळवे आदीसह लिंगायत समाज बांधव उपस्थित होते. यावेळी वीरशैव जंगम मठ ट्रस्टचे विश्वस्त अनिल जवळे यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविक वीरशैव जंगम मठ ट्रस्टचे अध्यक्ष शिवानंद कथले यांनी केले.
 
Top