Views



*माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पातील उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी विसर्ग सुरू, विविध लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

मागील एक महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. निम्न तेरणा प्रकल्प माकणीच्या उजव्या व डाव्या कालव्या लगत असलेल्या शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उमरगा, लोहारा तालुक्याचे आ.ज्ञानराज चौगुले यांनी गेल्या आठवड्यात लातूर विभागाचे अधीक्षक अभियंता उपकार्यकारी अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार करून संपर्क साधला होता. या अनुषंगाने दि.15 ऑगस्ट रोजी निम्न तेरणा माकणी प्रकल्प येथे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, औशाचे आ. अभिमन्यु पवार यांच्या उपस्थितीत उजव्या व डाव्या या दोन्ही कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. सध्या सदर प्रकल्पात एकूण 79 पॉईंट 525 दलघमी उपलब्ध पाणीसाठा असून यापैकी एकूण ओपन पॉईंट 33 टक्के म्हणजेच 49.5 58 दलघमी एवढा उपलब्ध पाणीसाठा आहे. सदर पाणीसाठा पैकी उजव्या कालव्याद्वारे तीन पॉईंट झिरो चार ग मी पर सेकंद व डाव्या कालव्याद्वारे तीन पॉईंट झिरो चार गर्मी पर सेकंद इतका विसर्ग होत असून सदरचे पुढील पंधरा दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे यामुळे उजव्या कालव्या लगतच्या माकणी, सास्तूर, राजेगाव, पेठ सांगवी, होळी, कवठा, आधी एकूण 23 गावातील शेतकऱ्यांना व डाव्या कालव्याला लगतच्या सारणी मंगरूळ आधी 20 गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी अधीक्षक अभियंता रोहित जगताप यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे लोहारा, कास्ती बुद्रुक चे सरपंच परवेज तांबोळी, मोगा बुद्रुक चे सरपंच सचिन गोरे, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, बालपीर शेख, पंडित ढोणे, आदी उपस्थित होते.
 
Top