Views


*कळंब तालुकाध्यक्षपदी रसूल तांबोळी यांची निवड*

कळंब:-प्रतिनिधी
 तालुक्यातील मस्सा ख येथील हात मिलाओ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व दैनिक लोकमतचे प्रतिनिधी रसूल दस्तगीर तांबोळी यांची मुस्लिम ओबीसी अॉर्गनायझेशनच्या कळंब तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे . उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष हाफिज अलीमोद्दिन यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी शेख गयासुद्दीन मुजावर जिल्हा सचिव , एडवोकेट उस्मान मोरवे महाराष्ट्र उपाध्यक्ष ,इम्तियाज बागवान जिल्हा युवक अध्यक्ष तसेच अजित गायके ,दिनकर वर्पे ,गणी मुलानी उपस्थित होते . या निवडीमुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

 
Top