Views


*लोहारा शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त लहुजी शक्ती सेनेच्या वतीने लोहारा शहरातील शिवाजी चौकात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन पोलीस निरिक्षक धरमसिंह चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, वसंतराव काळे विद्यालय मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील, पं स.माजी सदस्य दिपक वैशाख रोडगे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगरसेवक अभिमान खराडे, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष आयुब शेख, काँग्रेस शहराध्यक्ष के.डी.पाटील, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दगडू तिगाडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष बालाजी मेनकुदळे, माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल्य स्वामी, मेहबुब गवंडी, मिलिंद नागवंशी, विजयकुमार ढगे, प्रा.डॉ.प्रभाकर गायकवाड, पत्रकार निळकंठ कांबळे, गिरीश भगत, गणेश खबोले, आब्बास शेख, रमेश कोकणे, आयनोददीन सवार, प्रशांत काळे, प्रा.डि.एन.कोटरंगे, प्रा.डॉ.व्हि.डि.आचार्य भागवत वाघमारे, रियाज खाडीवले, अमोल माळी, उमाकांत लांडगे, लहुजी शक्ती सेना तालुकाध्यक्ष दिपक प्रकाश रोडगे, शहराध्यक्ष विकी मोरे, मीडिया प्रमुख सुदर्शन रोडगे, नितीन रोडगे, रवि पवार, बालाजी कसबे, विमल शिंदे, रेखा सरवदे, श्रीपती सुरवसे, बालाजी रोडगे, बळी रोडगे, सुरज कांबळे, धिरज कांबळे, यांच्यासह विविध पक्षाचे नेते,पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top