Views


*जिल्हा विधिज्ञ मंडळातर्फे विधिज्ञ, पक्षकार यांना 5000 N 95 मास्कचे वाटप*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

जिल्हा विधिज्ञ मंडळ उस्मानाबाद च्या वतीने दि.1 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालतच्या निमित्ताने पक्षकार विधिज्ञ व न्यायालयीन कर्मचारी यांना प्रमुख जिल्हा न्यायाधीश माननीय के.आर.पेटकर यांच्यावर हस्ते हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा न्यायाधीश नेर्लेकर साहेब, श्रीमती मखरे मॅडम, बार कॉउन्सिल महाराष्ट्र सदस्य अँड. मिलिंद पाटील, उपजिल्हाधिकारी श्रीमती चारुशीला देशमुख, जिल्हा सरकारी वकील अँड.शरद जाधवर, जिल्हा विधी मंडळाचे अध्यक्ष अँड.नितीन भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रमुख जिल्हा न्यायाधीश पेठकर साहेब म्हणाले की, आता जरी न्यायालयातील कामकाज पूर्णपणे सुरू झाले असले तरी पक्षकार, वकील, कर्मचारी, पोलीस यांनी आणखी काळजी घेणे गरजेचे आहे जेणेकरून आपण कोरोना सारख्या महामारी वर पूर्णपणे मात करू शकतो. या N 95 मास्क साठी मा जिल्हाधिकारी दिवेगावकर साहेब, जिल्हा शल्यचिकित्सक पाटील यांचे सहकार्य लाभले आहे. यावेळी एकूण एकूण पाच हजार N95 मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच हे मास्कचे चे वाटप पुढे चालू राहणार आहे. यावेळी विधीज्ञ मंडळाचे उपाध्यक्ष अँड.अतुल देशमुख,अँड.के.बी.डेंगळे, सचिव अँड.तानाजी चौधरी कोषाध्यक्ष अँड.भाग्यश्री कदम, सहसचिव ऍड.प्रवीण शेटे, ऍड.अरुणा गवई, महिला प्रतिनिधी ऍड.आकांशा माने, ऍड.अश्विनी सोनटक्के, यांच्यासह वरिष्ठ विधिज्ञ, पक्षकार उपस्थित होते.
 
Top