Views

*लोहारा तालुक्यात सध्या, कोविड-19 सोबतच डेंग्यू, चिकनगुण्या या रोगांचे रूग्ण निदर्शनास येत आहेत. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्यावतीने कंटेनर सर्वे, ताप सर्वेक्षण, मलेरिया साठी रक्त नमुने तसेच डेंग्यू, चिकनगुण्या साठी रक्त नमुने गोळा करणे, वापरण्याचे पाण्यामध्ये अबेट टाकणे, आदि कार्य सुरू*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

सध्या, कोविड-19 सोबतच डेंग्यू, चिकनगुण्या या रोगांचे रूग्ण निदर्शनास येत आहेत. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या वतीने कंटेनर सर्वे, ताप सर्वेक्षण, मलेरिया साठी रक्त नमुने तसेच डेंग्यू, चिकनगुण्या साठी रक्त नमुने गोळा करणे, वापरण्याचे पाण्यामध्ये अबेट टाकणे इत्यादी कार्य सुरू केले आहे. दिनांक 4 ऑगस्ट 2021रोजी पर्यंत एकूण 30 गावांमध्ये वरील कार्यवाही पुर्ण झाली असून दोन गावांमध्ये सूरू आहे. डेंग्यू चे रूग्ण यांची महिती खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. डेंग्यूसाठी NS1 नावाची तपासणी सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांचेकडे उपलब्ध आहे. यातून Positive आलेले रूग्ण हे डेंग्यू संशयीत म्हणून गृहीत धरता येतात. खात्रीपूर्वक डेंग्यू म्हणण्यासाठी ELISA तपासणी आवश्यक असते. सदर तपासणी ही सोलापूर,
 बीड येथील जिल्हा स्तरीय शासकीय प्रयोगशाळेत होते. त्यासाठी संशयीतांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविणे आवश्यक असते. आजपर्यंत लोहारा तालुक्यातून एकूण 31 रक्तजल नमुने सोलापूर येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी दोन डेंग्यू तर दोन चिकनगुण्या अहवाल सकारात्मक आले आहेत. (मार्डी,1-डेंग्यू, 1-चिकनगुण्या,
सालेगाव 1-डेंग्यू, 1-चिकनगुण्या)
----------------------------------------------------------------------
नागरिकांनी NS1 अहवाल सकारात्मक आला म्हणून लगेच घाबरून जाऊ नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. 
मच्छरदाणी चा वापर करावा. ताप अंगावर काढू नये -- तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे लोहारा
 
Top