Views


*डॉ.शामप्रसाद मूखर्जी समर्थ बूथ अभियान
 अंतर्गत भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने
 लोहारा शहरात मंडल निहाय शक्तिकेंद्र 
प्रमुखांची बैठक संपन्न*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

डॉ.शामप्रसाद मुखर्जी समर्थ बुथ अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद यांच्या वतीने मंडल निहाय शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक घेण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने भाजपाचे आ. राणाजगजितसिंह पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोहारा शहरातील भारतमाता मंदिर येथे बैठक घेण्यात आली. यावेळी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी तालुक्यातील जिल्हा परिषद गटानुसार बूथ कमिटीचा आढावा घेतला. व तसेच बुथ रचना संदर्भात आ. राणाजगजितसिंह पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य सुधीर अण्णा पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य ऍड.खंडेराव चौरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य ऍड.अनिल काळे, जिल्हा समनव्यक नेताजी पाटील, लोकसभा विस्तारक शिवाजी गिड्डे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुलदादा पाटील सास्तुरकर, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक आयुब शेख, जि.चिटणीस विक्रांत संगशेट्टी, तालुका सरचिटणीस शिवशंकर हतरगे, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, पं.स‌. सदस्य वामन डावरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम साठे, महिला तालुकाध्यक्ष आरती गिरी, तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदकर, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दगडू तिगाडे, सतीश गिरी, बालाजी चव्हाण, प्रमोद पोतदार, कमलाकर सिरसाठ, जयेश सुर्यवसे, शंकर अप्पा मुळे, रहेमान मुल्ला, कल्याण ढगे, यांच्यासह तालुक्यातील शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top