Views


*उपविभागिय अधिकारी कार्यालयावर जयभीम जन आंदोलनाचा भव्यमोर्चा*

कळंब(प्रतिनीधी)

 उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर जयभीम जनआंदोलनाचा महाराष्ट्रातील मागासवर्गीयावर होत असलेल्या अन्याय अत्याचार रोखण्यात अपयशी ठरलेल्या महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या निषेधार्थ दि.30/07/2021 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय कळंब येथे निषेध मोर्चा अनिल हजारे व चेतन शिंदे यांच्या नेत्रत्वाखाली हाजारोंच्या संख्येने काढण्यात आला मोर्चाची सुरुवातछ.शिवाजी महाराज चौक कळंब येथून सूरूवात करून उपविभागीय अधिकारी कार्यालया समोरवरील आवारासमोर आंदोलनकर्तेंनी आपले मनोगत शासनाच्या दारी मांडण्यात आली महाराष्ट्रामध्ये दलितावरील अन्याय अत्याचारामध्ये वाढ झाली आहे त्याचपद्धतीने कळंब तालूक्यातील खामसवाडी या गावामध्ये ग्रामपंचायतने अनाधिकृतपणे मागासवर्गीयांची घरे ऐन पावसाळ्यात मा सुप्रिम न्यायालयाच्या व महाराष्ट्र शासनाच्या नियमाची पायमल्ली करण्यात आली व हुकुमशाही पद्धतीने जेसीबीच्या सहाय्याने कळंब तहसिलचे नायब तहसिलदार अस्लम जमादार तलाठी कूलकर्णी पो उपनिरीक्षक नेटके ग्रामसेवक पटणे तसेच ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच यांनी समोर उभा राहून घरे पाडण्यात आली हे निषेधार्य कृती यांनी केली आहे त्याच प्रमाणे तालूक्यातील व जिल्ह्यातील गायरान जमीनी गावातील सरपंच व गाव पुढा-यांनी मागासवर्गीय समाज कसत असलेल्या गायरान जमीनी ताब्यात घेण्याचे काम केले त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे गायरान कसणा-या गायरान धारकांना तात्काळ गायरान जमीनीचे वाटप करण्यात यावी अशा अनेक विषयान्वये व महाराष्ट्रामधील मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचारामध्ये वाढ झाली आहे महाराष्ट्रातील मागासवर्गीयां वरचे अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी व खालील विवीध विषयांचे मागणी मान्य होण्यासाठी दि 30/07/2021 रोजी भव्य निषेध मोर्चाचे आंदोलन करण्यात आले होते त्या प्रमाणे मोर्चा काढण्यात आला *केंद्र व राज्य सरकारच्याविरोधातील निषेधमोर्चा मधील प्रमुख मागण्या* 
1)गायरान जमीनी वरील अतिक्रमण नियमाकुलीत करा.
भूमीहीन मजुरांना गायरान वाटप करा.
2)खामसवाडी येथील गायरान जमीनीवरील अतिक्रमण हुकूमशाही पद्धतीने काढणा-या ना.तहसिलदार ,ग्रामसेवक,
पोलीस उपनिरिक्षक,
तलाटी,सरपंच,उपसरपंच यांच्यावर अनू/जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करा.घरे बांधून द्या.
3) नोकरीतील पदोन्नतीतील आरक्षण पुर्ववत करा.
4)रमाई घरकूल योजनेचे अनूदान 5 लक्ष रूपये करा.
5) ॲट्रॉसिटीचा गून्हा दाखल झालेल्या आरोपींना अटक करून कडक कारवाई करा.
6) ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद केल्यानंतर काऊंटर गून्हा नोंद करणा-या पोलिस कर्मचारा वर फौजदारी गुन्हे दाखल करा.
7)कोव्हिड-19 मध्ये महिला बचत गटांना दिलेले कर्ज माफ करावे
8) पेट्रोल ,डिझेल,गँस, भाववाढ तात्काळ कमी करावी
9)तडवळ्यामधील डाँ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम तात्काळ पूर्ण करावे
10)महाराष्ट्रातील गायरान जमीनी दादासाहेब गायकवाड सबलीकरन योजनेतील लाभार्थ्यांना वाटप कराव्यात
11) निराधार,परितक्त्या संगायो,ईगायो पी एम किसान योजनेतील महिलांना प्रती महिना 6000 रु करण्यात यावा 
12)मागासवर्गीय लोकांसाठी सर्व गावात स्वतंत्र स्मशानभुमी उपलब्ध करून देण्यात यावी 
13) महात्मा फुले,आण्णाभाऊ साठे,संत रोहिदास,मौलाना आझाद व ईतर महामंडळाची कर्जे माफ करण्यात यावीत
मागासवर्गीय उद्योजकांसाठी शासनाने 5000 कोटीची तरतूद करावी
14) सर्व बँकेने मागासवर्गीय सूशिक्षीत बेरोजगाराला विना अट विना तारण 5 कोटी पर्यंतचे कर्ज वाटप करावे.
15) मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्काँलरशिप मध्ये महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी.
 या व अनेक मागण्यासाठि 
16) मागासवर्गीयांवर होत असलेले अन्याय तात्काळ रोखावेत
17)शासकिय दवाखान्यामध्ये जातिचा उल्लेख करावा लागतो तो काँलम रद्ध करावा 
18) ज्या लाभार्थ्यांना घरकूल मंजूर झाले परंतू जागा नाहि अशा लाभार्थ्यांना ग्रापने जागा देणे बंधनकारक आहे त्याचे काटेकोरपणे पालन व्हावे 
19) सर्व गाव एकत्र येवून अल्पसंख्याक समूदायाच्या विरोधात ग्रामसभा किंवा मासिक मीटिंग मध्ये चुकिचा ठराव घेत असेल तर तो रध्दबातल ठरवण्याचे प्रयोजन करावे
20) मराठा समाजाला आरक्षण द्यावे
21) मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे
    22)भोगवट्यामध्ये नाव असलेल्या लाभार्थ्यांना घरकूल बांधण्याची परवानगी देणे
23)आश्रम शाळेतील 10 वर्षापासून विनावेतन काम करत असलेल्या शिक्षकांना वेतन देण्यात यावे 
24 ) मराठा समाजाला आरक्षण जाहिर करावे
25) मुस्लीम समाजाला आरक्षण जाहिर करावे
      या मोर्चाला अनिल हजारे चेतन शिंदे अरुण गरड पंचशील कांबळे विठ्ठल मामा समुद्रे अँड आबासाहेब पायाळ अकाश गायकवाड अप्पासाहेब हजारे धम्मपाल शिंदे सुरज वाघमारे,सम्राट गायकवाड उत्तम सावंत अरुण कांबळे अमोल गाडे राहूल गाडे अरविंद ताकपेरे मस्के धनंजयप्रविण ताकपेरे विशाल वाघमारे बालाजी अंगरखे मुजीब पठाण बबन सोनटक्के शितोळे समाधान सुदाम घाडगे बालाजी वाघमारे बाबा कसबे राजाभाऊ आल्टे संजय गरड मिलींद शिंदे रसूल खां पठाण यशपाल शिंदे

 
Top