Views*माजी जि प उपाध्यक्षा सौ अर्चनाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिर संपन्न*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सौ .अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद येथे तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्राच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शहरातील डी फार्मसी उंबरे कोठा या भागात सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तेरणा ट्रस्ट संचलित नवी मुंबई नेरूळ येथील तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या सर्व रोग निदान उपचार तपासणी शिबिराचे उद्घाटन नगरसेविका सौ प्रेमाताई सुधीर पाटील यांच्या तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते आणि या सर्व रोग निदान शिबिराच्या आयोजिका सौ अर्चना ताई अंबुरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.ज्ञयावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर जिल्हा सरचिटणीस ॲड नितीन भोसले , भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ माधुरी गरड महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष वाकुरे ताइ , नगरसेवक शिवाजी गवळी पंगुडवाले यांच्यासह या परिसरातील डॉ चंद्रजीत जाधव सर पांडुरंग लाटे सर श्रीमती शेलवणे श्रीमती कोकाटे आणि भाजप समर्थक तसेच पदाधिकारी उपस्थित होते. या शिबिरात कान नाक घसा अस्थीरोग बालरोग नेत्ररोग या तज्ञांनी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून त्यावर विविध औषधोपचार दिले तसेच ज्यांना पुढील वैद्यकीय सुविधांची आवश्यकता आहे त्यांना नेरूळ येथील तेरणा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी येण्याचा सल्ला दिला.
सकाळी अकरा वाजता या शिबिराचे उद्घाटन झाले त्यानंतर या भागातील नागरिकांनी तपासणीसाठी मोठ्या प्रतिसाद दिला. या सर्व रोगनिदान शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक नागरिकासाठी आयोजिका सौ अर्चना ताई अंबुरे यांच्यावतीने सॅनिटायझर तसेच मास्क ची व्यवस्था करण्यात आली होती. तज्ञ डॉक्टरांनीही रुग्णांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे चौकशी करून आरोग्यविषयक सर्व प्रश्न आणि शंकांचे निरसन करून औषधोपचार केले. या शिबिरात 365 नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना वैद्यकीय सेवा देण्यात आल्या. यावेळी तेरणा जन सेवा केंद्राच्या जिल्हा समन्वयक डॉक्टर परवीन सय्यद डॉक्टर अजित निळे डॉक्टर राजन पाटील डॉक्टर निमिष पाटीदार डॉक्टर शंतनू कळंबे डॉक्टर ऋषिकेश जाधव आदींच्या टीमने रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांच्या आरोग्याची तपासणी करून रुग्णांना दिलासा दिला. या आरोग्य शिबिराच्या यशस्वितेसाठी सौ अर्चना ताई अंबुरे यांच्या मदतीला निर्मला शेळवणे दीपा राजपूत सविता सातपुते या महिलांनी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेवून हे शिबिर यशस्वी केले. या आरोग्य शिबिरासाठी डी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य देशमानेसर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आरोग्य शिबिरामुळे उंबरे कोठा परिसरातील आणि डी फार्मसी महाविद्यालय परिसरातील नागरिकांना वैद्यकीय दिलासा मिळाला आहे.
 
Top