Views


*दक्षिण जेवळी येथे कोविड महामारीचा प्रादुर्भाव रोखन्यासाठी शिवसेनेच्या व ग्रामपंचायतच्या माध्यमातुन जंतुनाशक फवारणी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लोहारा तालुक्यातील दक्षीण जेवळी गावात आ.ज्ञानराज चौगुले व शिवसेना युवानेते किरण गायकवाड व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सहकार्याने प्रत्येक घरा घरात, मुख्य रस्ता नाली सार्वजनिक ठिकाणी सर्व परिसरात ट्रॅक्टर द्वारे फॉगिंग मशीन ने निर्जंतुकीकरण फवारणी केली. यासह सार्वजनिक ठिकाणी ही सोडियम हैपोक्लोराईडची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आली. स्थानिकांनी या फवारणीचे जोरदार स्वागत व सहकार्य केले. नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी कोरोनाविषाणू मुक्त वातावरण होण्यासाठी रस्त्यावरील विषाणू घरात जाऊ नये यासाठी आ.ज्ञानराज चौगुले व शिवसेना युवानेते किरण गायकवाड व ग्रामपंचायतच्या माध्यमातून रस्त्यावर फवारणी करण्यात येत असल्याचे शिवसेना तालुका उपप्रमुख शिवराज चिनगुंडे यांनी सांगितले. यावेळी सरपंच चंद्रकांत साखरे, ग्रामसेवक शिवानंद बिराजदार, सिद्राम तांबडे, 
आप्पु भुसआप्पा, अदि, उपस्थित होते.
 
Top