Views*भाजप यांच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उस्मानाबाद शहरात निधींसंकलन मदतफेरी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मुळे कोकण व पश्चीम महाराष्ट्रात निसर्गाने थैमान घातले असून, त्या भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे कित्येक लोकांची घरे, संसार उघड्यावर आली आहेत या नैसर्गिक घटनेमुळे कोकण भागातील गावेच्या गावे उध्वस्त झाली आहेत, अनेक लोक मृत्युमुखी व जखमी झाले आहेत, या पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी एक पाऊल आपलेही या भावनेतून, भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद व भाजपा युवा मोर्चा यांच्या वतीने जिल्ह्याचे नेते भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर व आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये उस्मानाबाद शहरात निधी संकलनासाठी मदत फेरी काढण्यात आली. या मदतफेरी मध्ये शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपणही काही तरी देने लागतो हेच भाव जनतेच्या चेहऱ्यावर दिसत होते, ही मदतफेरी छत्रपती शिवाजी महाराज चौक उस्मानाबाद येथून सुरुवात करण्यात आली, तसेच जिल्हा न्यायालय, बसस्थानक, बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पोस्ट ऑफिस, काळा मारुती चौक, सोनार गल्ली, माऊली चौक व नेहरू चौकापर्यंत मदतनिधी फेरी काढण्यात आली. जनतेतुन उत्फुर्स प्रतिसाद मिळाला व मोठी रक्कम जमा झाली. याप्रसंगी निधी संकलन मदत फेरीमध्ये बुदधीजी प्रकोषठ प्रदेश सहसंयोजक तथा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍड.खंडेराव चौरे, जिल्हा सरचिटणीस ऍड.नितीन भोसले, रामदास कोळगे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजीत देवकते, ओम नाईकवाडी, चंद्रजित जाधव, दाजीप्पा पवार, बालाजी कोरे, मकरंद पाटील, संताजी वीर, सुजित साळुंके, आशिष नायकल, सुरज शेरकर, महेश बागल, सुनील पांगुडवाले, गणेश जावळे, प्रसाद मुंडे, गणेश इंगळगी, राहुल शिंदे, स्वपनील नाईकवाडी, गणेश एडके, मनोजसिंह ठाकुर, अमोल राजेनिंबाळकर, प्रसाद राजमाने, रोहित देशमुख, सार्थक पाटील, मेसा जानराव, दादुस गुंड, अक्षय भालेराव, रफिक शेख, अजिंक्य मोरे, किशोर लोंढे, यांच्यासह उस्मानाबाद शहर व ग्रामीण भागातील भाजपचे व युवा मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते.
 
Top