Views


*ग्रामीण भागातील क्रिडा स्पर्धा चालु करणे बाबत*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

२०११ सालापासून १६ वर्ष वयोगटातील ग्रामीण क्रीडा खो खो, कबड्डी, फुटबॉल, हॉलीबॉल, वेट लिफ्टिंग, तिरंदाजी, या स्पर्धा बंद केल्यामुळे ग्रामीण खेळाडूंचे मोठ्याप्रमाणात होत असलेल्या क्रीडा नुकसान या संबंधी माहिती चिखली भागातील विविध संस्थांनी आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे मांडली. राणादादांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून केंद्रीय क्रीडामंडळ मंत्र्याकडे हा मुद्दा भाजपा युवा मोर्चा उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार व केंद्र सरकार दरबारी मांडून ही स्पर्धा सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश व आश्वासन दिले. व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने संपुर्ण जिल्हयात खेळाडुंच्या सहया घेऊन हे दिनेवदन केद्रातील संबंधीत विभागकडे देऊन पाठ पुरावा करणार आहे. यावेळी उपस्थित गांधी विद्यालय चिखली चे क्रीडाशिक्षक दिलीप चव्हाण सर, जयराम चोबे, बबलू चोबे, सिद्धेश्वर गवळी, विक्रम चव्हाण, दत्ता नरवडे, अविनाश भुतेकर, सिद्धेश्वर सुरवसे तेजस सुरवसे, उपस्थित होते.
 
Top