Views*उस्मानाबाद जि.प.माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त भाजपा महिला मोर्चा उमरगा तालुका यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.व कर्मचाऱ्यांचा सत्कर*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उस्मानाबाद जि.प.माजी उपाध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त भाजपा महिला मोर्चा उमरगा तालुकाध्यक्षा सौ.सुलोचनाताई वेदपाठक यांच्या वतीने कोरोनाच्या काळात जिवाची पर्वा न करता चांगले कर्तव्य बजावित असलेल्या उमरगा शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.विक्रम आळंगेकर, डॉ.संदिप हुपळे, डॉ.अश्विनी पुरी, डॉ. शबनम बानो, वैजिनाथ पवार, पद्माकर घोगरे, सुधीर कुसुम, अरुणा कोळी, वर्षा निकम, आदिंचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष कैलास दादा शिंदे, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ.सुलोचनाताई वेदपाठक, उपाध्यक्षा मिना सुर्यवंशी, अॅड.अर्चना जाधव, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला लोहारा, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top