Views*लोहारा शहरातील महाराष्ट्र ग्रामिण बँकेची बदनामी करणाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी -- शेतकऱ्यांची मागणी* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 लोहारा शहरातील महाराष्ट्र ग्रामिण बँके मध्ये दलालाचा सुळसुळाट म्हणुन निवेदन देण्यात आले ते निवेदन बँकेची बदनामी करून शेतकऱ्याच्या कामात अडवणुक व्हावे या हेतुने दिलेले आहे, तरी याची चौकशी होऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी तहसीलदार लोहारा यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कांही दिवसापूर्वी महाराष्ट्र ग्रामिण बँकेमध्ये दलालाच्या सुळसुळाट कमी करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदन कर्त्याकडे किती शेतक-यांनी पीक कर्जासाठी पैशाची मागणी केली व दलाल कोण आहेत यांची नावे दिलेले नाही. फक्त स्वतःचे कामे व्हावे ह्या हेतूने खोटे निवेदन दिले आहे. याची चौकशी करण्यात यावे. शेतक-यांच्या जिव्हाळयाची बँक म्हणजे उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक हि होती. हि बँक थकबाकीमध्ये गेल्याने संपूर्ण शेतकरी वर्ग महाराष्ट्र ग्रामिण बँकेकडे वळलेले आहेत. आजपर्यंत आम्हा शेतक-याकडून बँकेत किंवा दलालाकडुन पेशाची मागणी करण्यात आली नाही. आम्ही आजपर्यंत पीक कर्जासाठी कोणालाही मध्यस्थी घातलेले नाही. थेट संपर्क शाखा अधिकारी या बँकेत आम्हाला मानसन्माने वागणूक देतात सर्व समजावून सांगतात. या बँकेत आम्हा शेतक-याची पिळवणूक झालेली नाही. पीक कर्जासाठी आगाऊ कागदपत्रांची मागणी करीत नाहीत. बँकेत शेतक-याचे वेळेवर कामे व्हावी म्हणून शिस्त बद्ध दिवस ठरवुन कागपत्र जमा करुन बँकेतुन फोन येतात की तुमची फाईल मंजुर झालेली आहे. तुम्ही बँकेशी संपर्क साधा एवढया मानसन्मानाने काम करणारी एकमेव बैंक आहे. तरी या बँकेच्या विरुद्ध खोटया तक्रारी देऊन वृत्तपत्रात बातमी प्रसारीत करुन बँकेच्या अधिकारी / कर्मचारी यांना मानसिक त्रास देऊन मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कांही नेते मंडळीकडे शेतकरी न जाता थेट बँकेशी संपर्क साधत असल्यामुळे नेते मंडळीला कमीपणा भासवत असल्याने बँकेच्या विरुद्ध खोटया बातम्या प्रसारीत करुन स्वतः श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी दिलेल्या निवेदन तक्रारीची चौकशी करावी तक्रारदाराकडे किती शेतक-याने तक्रार दिली व दलालाचे नावे सांगीतली असे आढळुन आल्यास दलाला विरद्ध कार्यवाही करणे ऐवजी बँकेच्या विरुद्ध तक्रार देऊन बँकेची बदनामी करीत आहेत. काही शेतकरी अशिक्षित असतात त्यांना कागदपत्रके काढण्यासाठी माहिती होत नाही. अशा शेतक-यांना ज्या त्या गावातील निस्पृह भावनेने समाजसेवक मदत करतात काही समाजसेवक म्हणून अशिक्षित शेतक-यांना मी तुझे काम केले म्हणून श्रेय लाटण्याचे काम करतात. आता कुणाला बँकेकडून श्रेय मिळत नसल्याने खोटया स्वरुपाच्या तक्रारी देत आहेत याची सखोल चौकशी करावी व अशा तक्रारीमुळे शेतक-यांच्या कामास अडचणी निर्माण होत आहेत. अशिक्षित शेतकरी वंचीत राहत आहेत. सदर निवेदनाची दखल घेऊन दिलेल्या निवेदनाची चौकशी करून प्रस्तुत प्रकरणी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर सतीष जाधव, श्रीनाथ सुरवसे, महेबुब फकिर, सुर्यवंशी लक्षमण, गणेश सुर्यवंशी, विजय हाले, गाडकेर उत्तम, गणेश जाधव, बाजीराव पाटील, मारूती सुरवसे , रमेश पवार, अजय पवार, इंद्रजित लोमटे, गुलाब सय्यद , दिपक जाधव , दादाराव गव्हाळे, नागनाथ गव्हाळे, सतीश गाडेकर, पंडित सूर्यवंशी , नरुणे विरेंद्र, शिवदास मोरे, प्रमोद चंदनशिवे , पाटील दत्तात्रय, अंगद गरड, यशवंत गरड, महादेव धारूळे, पंढरी मुरटे, आमोल गाडेकर, आजमोद्दीन सय्यद, गौतम पाटील, आबासाहेब सुर्यवंशी, प्रशांत सावळे, आदि शेतकऱ्यांचे स्वाक्षऱ्या आहेत.
 
Top