Views
*"श्यामाप्रसाद मुखर्जी समर्थ बूथ अभियान" अंतर्गत कळंब तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व सर्व कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न*

कळंब:(प्रतिनिधी)

"श्यामाप्रसाद मुखर्जी समर्थ बूथ अभियान" अंतर्गत कळंब तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व सर्व कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न झाली.
   याबाबत सुरुवातीस एकूण ८ जिल्हा परिषद गटानुसार बूथ कमिटीचा आढावा घेतला असता ४० शक्तिकेंद्र प्रमुख, ८ पालक, २०७ पैकी १९७ बूथ प्रमुख यांची नेमणूक झाल्याचे सांगण्यात आले.
सक्षम बूथ बनविणे, महिला सदस्यांचा समावेश करणे, सर्व समावेशक बूथ रचना करणे इत्यादींबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
  यावेळी जवळा (खुर्द) येथील कार्यकर्ते श्री.सचिन पवार यांची युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.बैठकीस उस्मानाबाद जिल्ह्याचे नेते तुळजापूरचे आमदार श्री.मा.राणा दादा पाटील,सुरेश देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे,सुधीर पाटील,नेताजी पाटील,रामहरी शिंदे,पंडितराव टेकाळे, भाजपा तालुकाध्यक्ष कळंब अजित पिंगळे,प्रशांत लोमटे ,सुरेश कोरे, विजेंद्र चव्हाण,अशोक तांबारे,अनिल टेकाळे, विकास बारकुल,वैभव मुंडे,शिवाजी गिड्डे पाटील,अरुण काका चौधरी,संतोष कस्पटे, माणिक बोंदर,संजय जाधवर,रोहित कोमटवार यांच्यासह तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top