Views*भूकंपग्रस्त भागातील नागरिकांना व शेतकऱ्यांना
प्लॉट जागा खरेदी विक्री करण्यासाठी सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधिकारी एन ए ची अट घालत आहेत, हि अट रद्द करुन 8 अ नुसार खरेदी विक्रीस परवानगी द्यावी --
राष्ट्रवादी लोहारा शहराध्यक्ष आयुब शेख*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 1993 मध्ये भूकंपा नंतर अनेक शेतकऱ्यांनी शहर वस्ती निर्माण करण्यासाठी तत्कालीन ग्राम पंचायत 8 अ नुसार प्लॉट जागा खरेदी विक्री केली आहे, उर्वरित प्लॉट धारक शेतकऱ्यांना सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधिकारी एन ए ची अट घालत असल्याने सदर बाब अन्यायकारक असल्याने तात्काळ आपल्या स्तरावरून भूकंपा मध्ये काही प्लॉट विक्री केल्याने उर्वरित प्लॉट एन ए करणे अवघड असल्याने 8 अ नुसार खरेदी विक्री करण्यासाठी परवानगी जैसे थे वैसे ठेवणे व यापुढे कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस लोहारा शहराध्यक्ष आयुब शेख यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तहसीलदार मार्फत निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे कि, शासनाने जे परिपत्रक काढले आहे ते मागील ग्राम पंचायत नोंदणी झालेले व वस्ती निर्माण झालेले असून यापुढे नवीन प्लॉट खरेदी विक्रीसाठी कायदा लागू करावे तसेच अनेकजणांनी ग्राम पंचायत नमुना नंबर 8 अ नुसार अर्धवट राहिलेले प्लॉटसाठी मुभा देण्यात यावे जेणे करून शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही.उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात 1993 साली भूकंप झाले होते. त्या वेळी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने भूकंप भागात अनेक शेतकऱ्यांनी वस्ती निवास वास्तव्य निर्माण करण्यासाठी ग्राम पंचायत कार्यालयात नकाशा व ग्राम पंचायत ला सार्वजनिक नागरिकांच्या प्रयोजनासाठी खुले जागा मूळ मालकाकडून दुय्यम निबंधक कार्यालयाकडून ग्राम सेवक यांच्या नावे दस्त करून ग्राम पंचायतला जागा देण्यात आली आहे. त्यानुसार मूळ मालकाचे 8 अ तयार करण्यात आले होते. आता शासनाने एन ए लागू केल्याने ग्रामीण भागातील व शहरातील नगर पंचायत हद्दीतील शेतकऱ्यांनी नमुना नंबर 8 अ नुसार जागा खरेदी विक्री केली आहे. त्यात अनेक शेतकऱ्यांची प्लॉट जागा खुली आहेत. आता एन ए लागू केल्याने या प्रोसेससाठी नगर पंचायत व ग्राम पंचायत साठी एन ए प्रोसेसनुसार ओपन स्पेस पुन्हा मूळ मालकाला जागा देणे अवघड व बुचकळ्यात पडणारे आहे. भूकंपामध्ये अनेक शेतकऱ्यांनी ग्राम पंचायत 8 अ नोंदणी प्रमाणे वस्ती साठी काही प्लॉट खरेदी विक्री केली आहे व अंतर्गत रस्ते देखील झाले आहेत तर आज ही अनेकांच्या शेतातील काही प्लॉट उर्वरित क्षिल्लक आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयाकडून एन ए ची अट सांगितले जात असल्याने अनेक शेतकऱ्याच्या शेतातील उर्वरित प्लॉट चें एन ए करता येणार नाही. लोहारा शहरातील ग्राम पंचायत नंतर नगर पंचायत अस्तित्वात आले आहे. भूकंपानंतर अनेकांनी तत्कालीन ग्राम पंचायत मध्ये शेतकऱ्यांनी जागेचे 8 अ ला नोंद केली आहे तर आज घडीला नगर पंचायत अस्तित्वात आलेले आहे. तत्कालीन ग्राम पंचायत व भूकंपानंतर 8 अ नोंद नुसार आज घडीला अनेक शेतकऱ्यांनी कुटूंबाचा गाडा हकण्यासाठी वेळेनुसार प्लॉट विक्री करीत आहेत तर काही प्लॉट अर्धवट आज ही आहेत. परंतु अचानक प्लॉट विक्रीसाठी एन ए ची अट अधिकारी सांगत असल्याने एक प्रकारे शेतकऱ्यांची कुचंबणा केली जात आहे. लोहारा उमरगा तालुका हे ग्रामीण भागातील तालुका असून भूकंप प्रवण क्षेत्र असल्याने व येथील शेतकऱ्यांनी भूकंपामध्ये तात्कालीन ग्राम पंचायत व आजची लोहारा नगर पंचायत मध्ये जुन्याच नोंदी असल्याने अर्धवट प्लॉट खरेदी विक्री तात्काळ चालू करण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेश देऊन येथील शेतकऱ्यावर होणारे अन्याय दूर करावे. व जुन्या ग्राम पंचायत व नगर पंचायत मध्ये झालेल्या नोंदी खरेदी विक्रीसाठी नियम शिथिल करावे व यापुढे एन ए ची अट कायम करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी शहराध्यक्ष आयुब शेख, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस शबीर गवंडी, राजेंद्र कदम, सुरेश वाघ, मिलिंद नागवंशी, माजी सरपंच नवाज सय्यद, ताहेर पठाण, अजीज सय्यद, रियाज खाडीवाले, असिफ शेख, आदीच्या सह्या आहेत.
 
Top