Views
*मुरुम ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेड व i.s.o. चालु करण्यात यावा, अशी मागणी भाजपा व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिणियार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

मुरुम ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेड व i.s.o. चालु करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन भाजपा व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिणियार यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, मुरुम शहरात व परिसरातील 25 गावात कोरोणा रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मुरुम शहरातील ग्रामीण रुग्णालयाची अद्यावत बिल्डिंग आहे. सदरील बिल्डिंग मध्ये 25 ऑक्सिजन बेडची सुविधा आहे. ज्या कि कार्यरत नाही. ह्याची चौकशी केली असता मुरुम रुग्णालयात 10 जम्बो ऑक्सीजन सिलेंडर होते. त्यापैकी 5 उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर व 2 उपजिल्हा रुग्णालय उमरगा या ठिकाणी देण्यात आले आहेत. सध्या मुरूम शहर व परिसरातील कोरुना रुग्णांना उमरगा उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे ऍडमिट व्हावे लागते. तेथे बेड उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना खासगी दवाखान्यात जावे लागत असून अनेक रुग्ण उपचार घेऊ शकत नाहीत. तरी ग्रामीण रुग्णालय मुरूम येथे 25 ऑक्सीजन बेडची सुविधा उपलब्ध करून द्यावी व या ग्रामीण रुग्णालयात 1 फिजिशियन डॉक्टर उपलब्ध करून द्यावे, ही सुविधा लवकरात लवकर करावी, जेणेकरून या भागातील सर्वसामान्य रुग्णांना उपचार करण्यास मदत होईल, अशी मागणी निवेदनात केली आहे.
 
Top