Views


*तुळजापूर भक्त निवसातील कोविड सेटरमधील
ऑक्सिजन लाईनचे पालकमंत्री गडाख हस्ते लोकार्पण*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
 
श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थांनच्यावतीने 300 बेड पैकी 145ऑक्सिजन बेडचे भव्य कोविड सेन्टर तुळजापूरच्या भक्त निवासात उभारले आहे . या कोविड सेंटर मधील ऑक्सीजन पुरवठा लाईनचे लोकार्पण पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते आज करण्यात आले. भक्तनिवासमध्ये उपचार घेत असलेल्या काही रुग्णांशी पालकमंत्री श्री .गडाख यांनी संवाद साधून त्यांच्या तब्येतीची ,औषधोपचार व सुविधाबाबत चौकशी केली. यानंतर त्यांनी उपजिल्हा रुग्णालय येथे सुरू असलेल्या लसीकरण केंद्रास भेट दिली आणि संबंधित अधिकाऱ्यांना लसीकरण व्यवस्थित करण्याबाबत सूचना दिल्या . यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आ. ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, पोलिस अधीक्षक राजतीलक रोशन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, जिल्हा शल्यचिकित्सक डी.के.पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही. वडगावे, माजी जि.प.अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, शिवसेना शहरप्रमुख सुधिर कदम, प्रतिक रोचकरी, तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, नगरपालिका मुख्याधिकारी डॉ.आशिष लोकरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुहास पवार, रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ.श्रीमती चंचल बोडके आदी अधिकारी उपस्थित होते.
 
Top