Views

*लोहारा शहरात मोकाट फिरणाऱ्या लोकांची अन्टीजेन तपासणी करुन दंडात्मक कारवाई*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 लोहारा शहरामध्ये मोकाट फिरणाऱ्या लोकांची दि.11 मे 2021 रोजी कोरोना अन्टीजेन तपासणी करुन दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी 66 लोकांची अन्टीजेन तपासणी करण्यात आली. यामध्ये 66 तपासणी पैकी 1/वय ४० वर्षे लोहारा खु, 2/हिप्परगा रवा वय १५ वर्षे,3/ धानुरी वय 12 वर्षे असे एकुण 3 पाॅझेटिव्ह कोरोना रुग्ण निघाले. प्रशासनाने अन्टीजेन तपासणी करुन दंडात्मक कारवाई केल्यामुळे मोकाट फिरणाऱ्यांचे दणाणले आहेत. यामुळे मोकाट फिरणाऱ्या लोकांवर चांगला चाप बसावा आहे‌. यावेळी तहसीलदार संतोष रुईकर, तालुका आरोग्य अधिकारी अशोक कठारे, सहायक पोलिस निरीक्षक वाटोडे, नायब तहसिलदार दिगंबर स्वामी, महसुल सहायक भागवत गायकवाड, वजिर अत्तार, तलाठी समाधान माळी, सचिन फड, कक्ष सेवक नाथा फुलसुंदर नाथा, यांच्यासह अरोग्य विभाग सेवक, महसुल प्रशासन, पोलीस कर्मचारी उस्थित होते.

 
Top