Views


*कानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह तालुक्यातील कास्ती बु, खेड, माकणी या गावास उमरगा येथील उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांची भेट*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास दि.7 मे 2021 रोजी उमरगा येथील उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी भेट देऊन पाहणी करून मार्गदर्शन कले. व डॉक्टरांनी जास्तीत जास्त कोरोणा टेस्टींग करुण घ्याव्यात. यासाठी नागरीकांना जागृत करावे असे सांगितले. व तसेच लोहारा तालुक्यातील कास्ती बु, खेड, माकणी या गावास भेट देवुन पाहणी केली. खेड गावातील वाढत्या कोरोनाग्रस्तांची आकडेवारी पाहुन गावामध्ये बाहेर गावावरुन कोणी येणार नाही व गावातून बाहेरगावी कोणी जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, तालुक्यातील गावात अडचणी असतील तर याबाबत तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, असे अधिकारी व कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक यांना सुचित केले. या पुढे अधिक दक्षता घेवुन कडक लॉकडऊन करण्यात यावा, अशी कडक सूचना केल्या. यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी केले. यावेळी तहसीलदार संतोष रूईकर, गटविकास अधिकारी सोपान अकेले, सरपंच नामदेव लोभे, मंडळ अधिकारी बरनाळे, भागवत गायकवाड, सरपंच नामदेव लोभे, ग्रामसेवक महादेव भिल्ल, वैद्यकीय अधिकारी डॉ.आदटराव, यांच्यासह सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, डॉक्टर, नर्स, नागरीक, उपस्थित होते‌.
 
Top