Views


*जागजी येथे कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 जागजी ता.जि.उस्मानाबाद येथे विस्तार अधिकारी भांगे. एस.ए‌‌. यांच्या पथकाने व ग्रामपंचायत जागजी यांनी संयुक्तपणे विना मास्क फिरणे, दुकाने उघडे ठेवणे, विना परवाना बाहेर जिल्हा मधुन प्रवेश करणे, प्रवास क्षमतेपेक्षा जास्त माणसे बसवणे इत्यादी बाबी संबंधी कोरोनाच्या नियमाचे पालन न केल्याने दंडात्मक कार्यवाही करुन ४००० रू एवढा दंड वसूल केला. या वेळी विस्तार अधिकारी (पंचायत) शंकर भांगे, उपसरपंच वैजिनाथ सावंत, ग्रामविकास अधिकारी सचिन वाघे, मुख्याध्यापक बापुसाहेब मेंढेकर, पोलीस कर्मचारी श्री. जाधवर, श्री.पवार व ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी हजर होते.
 
Top