Views
*मुरूम शहरात मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप 
नगरसेवक अजित चौधरी यांचा स्तुत्य उपक्रम*       
 
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

युवासेना तालुकाप्रमुख तथा नगरसेवक अजित चौधरी यांच्या वतीने मुरुम शहरातील नागरिकांना मोफत सॅनिटायझर व एन ९५ मास्कचे वाटप बुधवारी (ता.५) मे रोजी करण्यात आले. शहरातील मुख्य बाजारपेठेतील बसवेश्वर चौकात नगरसेवक अजित चौधरी यांच्या वतीने मोफत एन ९५ मास्क व सॅनिटायझरचे भाजीपाला व्यवसायीक व नागरिकांना वाटप करण्यात आले. नगरसेवक अजित चौधरी यांच्या हस्ते शहरातील गरीब नागरिकांना एक हजार सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी जगदीश निंबरगे, बसवराज कलशेट्टी, संजय आळंगे, राम पाटील, अरिफ कुरेशी आदिंची उपस्थिती होती. कोरोना संकटाच्या काळात जिवाची पर्वा न करता, रूग्णाची काळजी घेणाऱ्या आरोग्य कर्मचारी यांनी रूग्णांना मानसिक आधार देऊन कोरोनाविरुद्ध लढण्याचे बळ देत आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या सेवेचे ॠण म्हणून कोरोनामुक्त झालेल्या एका युवकाची कोविड सेंटर मध्ये जावून भेट दिली. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांचाही त्यांनी सत्कार करून सेंटरमधील कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर भेट दिले. विशाल मोहीते, नाना टेकाळे, मोहन जाधव, जयसिंह खंडागळे, उमेश कारडामे, अनिकेत टेकाळे, अतिश चौधरी, राघवेंद्र चौधरी, दत्ता चौधरी, अजित बिराजदार सह युवासेना व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.
 
Top