Views


*कळंब तालुक्यासाठी कोवँक्सिन लसीचा दूसरा डोस उपलब्ध करुन देण्यात यावा -- स्फुर्ती फाऊंडेशन*            

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

कळंब तालुक्यासाठी कोवँक्सिन लसीचा दूसरा डोस उपलब्ध करुन देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन स्फुर्ती फाऊंडेशनच्यावतीने पालकमंत्री शंकरराव गडाख यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, लसीकरण सुरु झाले नंतर 45 वयाच्या पुढील नागरीकांनी कोवँक्सिनचे लसीकरण करुन घेतले, त्यांचा पहिला डोसचा कार्यकाल संपून गेला आहे, यामुळे दूसरा डोसच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरीकांना काळजी वाटत आहे, तरी आपण आठवड्यातील एक किंवा दोन दिवस *फक्त 45 पुढील नागरीक व दूसरा डोस देण्यासाठी तात्काळ नियोजन करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर 
 स्फुर्ती फाऊंडेशन अध्यक्ष शिवाजी गिड्डे पाटील, सचिव यांची सह्या आहेत. या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी उस्मानाबाद, उपविभागीय अधिकारी कळंब यांना देण्यात आले आहेत‌‌.
 
Top