Views


*लोहारा कोव्हीड केअर सेंटर येथे वैदयकिय अधिक्षकासह डॉक्टरर, नर्स, अरोग्यण सेवक व कोरोनामुक्त झालेल्या‍ नागरिकांचा तहसीलदार संतोष रुईकर यांच्या हस्ते सत्कार* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा येथील औदयोगीक प्रशिक्षण संस्था येथील अतिरिक्त कोव्हीनड केअर सेंटर येथे दि.10 मे 2021 रोजी तहसीलदार संतोष रुईकर यांनी भेट देऊन कोरोनाग्रस्त रुग्णांशी संपर्क साधुन त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपुस करुन आपण घाबरु नका आम्ही प्रशासन आपल्या पाठीशी आहोत, असे म्हणुन आधार दिला‌. नुकतेच कोरोनामुक्त झालेल्यांचा तहसीलदार संतोष रूईकर यांनी पुष्प गुच्छ देवुन सत्कार केला. वैदयकिय अधिकारी यांनी दिलेले औषधोपचार ची माहिती घेवुन रुग्णांला सांगीतले कि, तुम्ही ठणठणीत बरे झाले आहात, असा धिर दिला. यावेळी बरे झालेल्या रुग्णांचे अश्रु अनावरण होऊन त्यांनी वैदयकिय अधिक्षक, डॉक्टर नर्स व अरोग्यं सेवकांचे आभार मानले. या कोरोणाच्या काळात जिवाची पर्वा न करता रात्रणदिवस रुग्णांस सेवा देत असल्याबद्दल लोहारा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.गोविंद साठे, डॉ.कोमल मगर, नर्स सपना सगट, खंडु शिंदे खंडु, यांच्यासह अरोग्यय सेवकांचा पुष्प गुच्छ देउन सत्कार करण्यात आला. यांचे तोंड भरुन कौतुक करुन भविष्या तही अशाच कामगीरीची अपेक्षा आपल्याकडुन आहे. असेच आपण चांगले काम करावे, प्रशासन आपल्या पाठीशी आहे, असे तहसीलदार संतोष रूईकर यांनी सांगीतले. याप्रसंगी महसुल सहाय्यक भागवत गायकवाड, ऑपरेटर विनोद जाधव, अदि, उपस्थित होते.
 
Top