Views


*लोहारा शहरातील कोविड केअर सेंटर मधील कोरोना रुग्णांना रोटरी क्लब मुंबई व स्पर्श रुग्णालय सास्तुर यांच्या वतिने आ.ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड व स्पर्श ग्रामीण रुग्णालयचे प्रकल्प अधिकारी डॉ.जोशी यांच्या हस्ते रुग्णांना औषधे वाटप*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 लोहारा शहरातील कोविड केअर सेंटर डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह व आय.टी.आय.कॉलेज येथे रोटरी क्लब मुंबई व स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तुर यांच्या वतिने दि.10 मे 2021 रोजी आ.ज्ञानराज धोंडीराम चौगुले व युवानेते किरण रविंद्र गायकवाड व डॉ. रमाकांत जोशी (स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तुर) यांच्या हस्ते लोहारा तालुक्यातील संपूर्ण कोरोना रुग्णांना लागणारे औषधे देण्यात आली. तसेच यावेळी आ.ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांच्या हस्ते कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांचा सत्कार करण्यात आला. तसेच कोरोणाच्या काळात कोनतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थ सेवा केलेल्या लॅब टेक्निशिअन मुलीचाही सत्कार करण्यात आला. यावेळी आ.चौगुले यांनी लोहारा शहरातील रुग्णांची स्थिती त्यांच्या अडचणी जाणुन घेऊन उपाययोजणा करण्याच्या सुचना केल्या. यावेळी बाबुराव शहापुरे ( शिवसेना तालुका प्रमुख उमरगा), अमोल बिराजदार (युवासेना तालुका प्रमुख लोहारा), सलीम शेख (शिवसेना शहर प्रमुख लोहारा), शरद पवार (विधान सभा अध्यक्ष), अभिमान खराडे (माजी नगरसेवक), महेबुब गंवडी (माजी ग्रा.पं.सदस्य), श्रीकांत भरारे (युवासेना शहरप्रमुख), अशोक कटारे (तालुका वैद्यकिय अधिकारी), डॉ. गोविंद साठे(वैद्यकिय अधिक्षक), ,उपस्थित होते.
 
Top