Views


*जेवळी येथे स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेअतर्गत ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न*

लोहारा /इकबाल मुल्ला

लोहारा तालुक्यातील जेवळी येथे स्वयंम शिक्षण प्रयोग या संस्थेअंतर्गत उस्मानाबाद जिल्हा व लातूर जिल्ह्यातील गावांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात 350 गावकऱ्यांनी सहभाग घेतला असून यावेळी हे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले. या प्रशिक्षणाला स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेचे बाळासाहेब काळदाते यांनी यावेळी कोरोना विषयी मार्गदर्शन करताना म्हणाले की, मास्कचा वापर करून हात स्वच्छ धुवने व नाक व तोंडाची स्वच्छता राखावी, असे सांगितले. व तसेच शेतीविषयक माहिती स्वयंम शिक्षण प्रयोगाचे माधव गोरकट्टे यांनी कमी खर्चाची शेती करण्यासाठी बीजप्रक्रिया, कश्या पद्धतीने लागवड करावी व उगवण क्षमता पाहणे, गांडूळ खताचा वापर करावा, असे सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाचे सुत्रसचालन सौ.अंजना साबळे यांनी केले‌. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वयंम शिक्षण प्रयोगाच्या शितल रानखांब, अंजना साबळे, ज्योसना माने, शिल्पा वलदोडे यांनी सहकार्य केले.
 
Top