Views

*छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त
बार्टीचा ऑनलाईन व्याख्यानाचा उपक्रम*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे अंतर्गत आज 06 मे 2021 रोजी उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक कार्य या विषयावर ऑनलाईन व्याख्यान घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी तुषार कदम होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर देशमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समतादूत नागेश फुलसुंदर यांनी केले तर आभार  समतादूत रमेश नरवडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील समतादूत गोविंद लोमटे, किरण चिंचोले, गणेश मोटे, सुहास वाघमारे, अर्चना रणदिवे, यांच्यासह जिल्ह्यातील श्रोते मोठया संख्येने उपस्थित होते.


 
Top