Views


*पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर हिंसाचार करीत भाजपच्या कार्यकर्त्यांची हत्या केली आहे, यांच्यावर कठोर कारवाई करावी -- भाजपा लोहारा तालुका*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर हिंसाचार करीत भाजपच्या कार्यकर्त्यांची हत्या केली आहे, यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी तहसीलदार संतोष रुईकर यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुडाचे राजकारण करीत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा खून केला आहे. या कार्यकर्त्यांनी गुंड प्रवृत्तीने हल्ले करीत घरांची जाळपोळ व दुकानांना व व्यवसायाच्या ठिकाणी आग लावून जाळपोळ करून जीविताची हाणी करून मालमत्तेची मोठ्या प्रमाणात नुकसान केली आहे. व तसेच महिलांवर देखील अत्याचार केला आहे. ही घटना लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा भारतीय जनता पार्टी लोहारा तालुका यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तरी  
तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदकर, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, उपस्थित होते.
 
Top