Views    *सारोळा, काजळा गावच्या विकासासाठी ५० लाखाचा निधी मंजूर उपळा, वाघोली, चिखली, दारफळ, मेडसिंगा, सकनेवाडी गावच्या विकासासाठी नव्वद लाखाच्या निधीचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत!*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 उस्मानाबाद तालुक्यातील ८ गावच्या विविध विकास कामांच्या १ कोटी ४० लाख रुपयेपैकी ५० लाखाच्या निधीस मंजूरी मिळाली आहे़. ६ गावांच्या निधीचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत़. जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी आ़.सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्फत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे उस्मानाबाद तालुक्यातील ८ गावच्या विविध विकास कामाचे १ कोटी ४० लाख रूपये निधी मागणीचे प्रस्ताव दिले होते़. सारोळा व काजळा गावास ५० लाखाचा निधी मंजूर करण्यात आले आहेत. तर उर्वरित ६ गावच्या विविध विकास कामाचे ९० लाख रुपयांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत़. राज्याचे ग्रामविकास मंत्री ना़ मुश्रीफ यांच्याकडे आ़. सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्फत पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रुक), काजळा, वाघोली, उपळा (मा़), चिखली, मेडसिंगा, दारफळ, सकनेवाडी या ८ गावच्या विविध विकास कामासाठी २५-१५ योजनेतंर्गत निधीची मागणी केली होती़ आ़.ठाकूर यांच्या पत्राची दखल घेवून ना़.मुश्रीफ यांनी एकूण १ कोटी ४० लाख रुपये पैकी सारोळा व काजळा गावच्या विकासासाठी ५० लाख रुपये निधी मंजूर केला आहे़. यामधून सारोळा येथे पेव्हर ब्लॉक, सिमेंट रस्ते व नाली कामासाठी ३० लाख तर हायमस्ट लॅम्पसाठी १० लाख मंजूर केले आहेत़ तर काजळा येथे हायमस्ट लॅम्प उभारणीच्या कामासाठी १० लाख मंजूर केले आहेत़ तर वाघोली येथे हायमस्ट लॅम्प १० लाख, सिमेंट रस्ता व नाली १० लाख, उपळा (मा़) येथे हायमस्ट लॅम्प उभारणीसाठी १० लाख, मेडसिंगा येथे हायमस्ट लॅम्पसाठी ५ लाख, सकनेवाडी येथे हायमस्ट लॅम्पसाठी ५ लाख, चिखली येथे सिमेंट रस्ता व नाली काम १० लाख, हायमस्ट लॅम्प उभारणीसाठी १० लाख असे ४० लाख, दारफळ येथे हायमस्ट लॅम्प कामासाठी ५ लाख तर काजळा येथे गाव अंतर्गत रस्ते व नाली कामासाठी १५ लाख रुपये निधीचे प्रस्ताव सादर केले आहेत़. पहिल्या टप्प्यात सारोळा व काजळा गावासाठी तब्बल ५० लाख रुपये मंजूर केले आहेत़. उर्वरित ६ गावच्या विविध विकास कामांचे प्रस्ताव व निधी मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहेत़. अत्यंत प्रतिकुल स्थितीमध्ये ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामविकास मंत्री ना़.मुश्रीफ व आ़.ठाकूर यांचे पत्रकार संघाचे अध्यक्ष रणदिवे यांनी विशेष आभार व्यक्त केले आहेत़.
 
Top