Views


*उस्मानाबाद जिल्ह्यात ८ ते १३ मे पर्यंत जनता कर्फ्यू-जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकार यांचे आदेश....*

उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी) 

उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढल्याने दि. ८ मे ( शनिवार ) ते १३ मे ( गुरुवार ) असे सलग सहा दिवस जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी तसा आदेश काढला आहे. 
उस्मानाबाद शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्याने आणि मृत्यूदर वाढल्याने शहरात कडक लॉकडाऊन करावा, अशी मागणी आमदार कैलास नगराध्यक्ष मकरंद फुंक संघटनेचे अध्यक्ष एम डी देशमुख सचिव धर्मवीर कदम यांच्यासह अनेक संघटना व नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली होती. लॉकडाऊनमध्ये मेडिकल वगळता सर्व आस्थापना बंद ठेवाव्यात अशी मागणी करण्यात आली होती., त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला आहे 
Top