Views
*आ.सुरेश आण्णा धस यांनी लातुर व उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णांसाठी दोन रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यासाठी ५० लक्ष रुपयांचा निधी आमदार फंडातून दिला*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला 
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला मोठ्या शितापीने सामोरे जावे लागत लागते, कोरोना काळात रुग्णांची रुग्णवाहिके अभावी हेळसांड होताना, वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने अनेक रुग्ण दगवल्याचे वेदनादायी प्रकार दिवसेंदिवस घडत आहेत. बीड लातुर उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे प्रतिनिधी म्हणून आमदार सुरेश आण्णा धस यांनी १५ दिवसांपूर्वी आष्टी, पाटोदा व शिरूर तालुक्याला दोन रुग्णवाहिका देण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी वितरीत करून प्रशासकीय मान्यतेसाठी पत्र पाठवले होते. आज आमदार सुरेश आण्णा धस यांनी लातुर व उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णांसाठी दोन रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यासाठी ५० लक्ष रुपयांचा निधी आमदार फंडातून वितरित करून प्रशासकीय मान्यता देण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांकडे प्रस्ताव पाठवले आहेत. जनतेच्या सेवेसाठी आमदार सुरेश आण्णा धस यांच्या माध्यमातून रुग्णवाहिका उपलब्ध होऊन अनेकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून पूर्णत्वास जाईल.

 
Top