Views


*ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन बेडची  सुविधा कार्यान्वित -- भाजप राष्ट्रवादीच्या मागणीला यश*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उमरगा तालुक्यात मुरूम शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन बेडची सुविधा तात्काळ कार्यान्वित करावी अन्यथा  मंगळवारी दि 11 रोजी पासून ग्रामीण रुग्णालया समोर अन्न त्याग आंदोलनचा अवलंब करण्यात येईल असा इशारा  राष्ट्रवादी युवक काँग्रेस व भाजपच्या वतीने देताच प्रशासनाने याची दखल घेत ऑक्सिजन बेडची सुविधा रुग्णांच्या सेवेत दि 11 रोजी पासून कार्यान्वित केली आहे या बाबतची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ वसंत बाबरे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस व भाजपच्या वतीने आरोग्य मंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मुरूम ग्रामीण  रुग्णालयात 25 ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध आहे मात्र तज्ञ फिझिशिएन तसेच इतर साधन सामुग्री नसल्याने कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालय प्रशासन जिम्मेदारी घेत नसल्याचे दिसून येत आहे तसेच रुग्णालयातील राखीव 10 जंबो सिलेंडरपैकी 5 सिलेंडर तुळजापूर  तर उमरगा येथे दोन पाठविण्यात आले आहेत.येथील ग्रामीण रुग्णालयात मुरूम व परिसरातील 20 ते 25 गावातील रुग्ण उपचारासाठी येत आहेत यातील गंबीर रुग्णांना उमरगा उपजिल्हा रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात येत आहे मात्र उमरगा येथे ऑक्सिजन बेड मिळत नाहीत. त्यामूळे  मुरुम ग्रामीण रुग्णालयात  ऑक्सिजन बेडची तांत्रिक बाबी दूर करून सुविधा कार्यान्वित करण्यात यावी अशी मागणी दोन्ही पक्षाच्या वतीने करण्यात आली होती परंतु प्रशासन या कडे  साफ़दुर्लक्ष करत होते यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी व भाजप कडून रुग्णालयातील उपलब्ध ऑक्सिजन बेड सुविधा  दि.10 रोजी पर्यंत कार्यान्वित करून  रुग्णांनाची होणारी हेळसांड थांबवावी अन्यथा मंगळवारी दि.11 रोजी पासून ग्रामीण रुग्णालयासमोर दोन्ही पक्षातर्फे संयुक्त अन्नत्याग आंदोलनाचा अवलंब करणार असा इशारा देण्यात आला होता जिल्हाधिकारी व आरोग्य विभाग यांनी याची दखल घेत रुग्णालयातील ऑक्सिजन बेडची तांत्रिक बाबी दूर करून दि.11 पासून रुग्णाच्या सेवत कार्यान्वित केली आहे 
----------------------------------------------------------------------
ग्रामीण रुग्णालयातील उपलब्ध ऑक्सिजन बेड सुविधा कार्यान्वित करण्याची मागणी केली परंतु प्रशासन दिरंगाई करत असल्याने अन्नत्याग आंदोलन करण्याचा मार्ग अवलंबला होता तसेच भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुरजितसिंह ठाकूर, आ.ज्ञानराज चौगुले, आ.
राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आले होते. प्रशासना कडून आंदोलन पूर्वीच मागणी मान्य करून सुविधा कार्यान्वित केल्याने सदर आंदोलन स्थगित करत आहे -- श्रीकांत मीणियार जिल्हाध्यक्ष भाजप उद्योग आघाडी
-----------------------------------------------------------------------
ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेड सुविधा अभावी शहर व परिसरातील कोविड अत्यवस्थ रुग्णाची हेळसांड होत असल्याने उपलब्ध ऑक्सिजन बेड सुविधा कार्यान्वित करण्याची मागणी करून देखील संबंधित विभाग टाळाटाळ करीत असल्याने दि.11 रोजी पासून अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार होते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा करत उपलब्ध सुविधा कार्यान्वित करण्यासाठी संबंधिताना आदेश देण्याची मागणी केली होती प्रशानाने याची दखल घेत दि‌11 पासून उपलब्ध सुविधा कार्यान्वित केली आहे तयामुळे सदर चे स्थगित करत आहे -- मोहन जाधव जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस
 
Top