Views


*८ मे ते १३ मे सलग सहा दिवस जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे*उस्मानाबाद (प्रतिनिधी)

      उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढल्याने दि. ८ मे  ( शनिवार ) ते १३ मे  ( गुरुवार ) असे सलग सहा दिवस जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी तसा आदेश काढला आहे. उस्मानाबाद शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्याने आणि मृत्यूदर वाढल्याने शहरात कडक लॉकडाऊन करावा, अशी मागणी  नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली होती.  कडक लॉकडाऊनमध्ये मेडिकल वगळता सर्व आस्थापना बंद ठेवाव्यात अशी मागणी करण्यात आली होती. 

जिल्ह्यातील विविध पदाधिकारी तसेच संघटनांनी देखील कडक लॉकडाऊनची मागणी केली होती, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला आहे. 


मेडिकल, दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद राहणार  आहेत. 


काय आहे आदेश ?


 
Top